सिंदेवाही प्रतीनिधी:- सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मरेगाव- गुंजेवाही रोड वरील मरेगाव (चक) जवळ ट्रॅक्टर पलटी मारून इसमाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना काल रात्रौच्या सुमारास घडली.
सिंदेवाही प. स. सदस्य राहुल पोरड्डीवार यांच्या मालकीची विना नंबर प्लेट ची आयशर ट्रॅक्टर ड्रायव्हर प्रेमा सुधाकर मोहुर्ले व दिपक बापूजी चौधरी (वय 40) रा. पवना हे सिंदेवाही वरुन रात्रौ 8.30 च्या सुमारास पवनपार येथे जात होते. सदर ट्रॅक्टर मरेगाव चक (टोल्या) समोर गेली असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी मारून दिपक बाबुजी चौधरी (वय 40 वर्षे) हा इसम जागीच ठार झाला तर प्रेमा सुधाकर मोहुर्ले हा गंभीर जखमी झाला.
जखमी प्रेमा सुधाकर मोहुर्ले याच्यावर सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयात उपचार चालू असून संपूर्ण घटनेचा तपास सिंदेवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार राऊत करीत आहे.






