आर्मीतील युवा सैनिकाच्या मृत्युने परिसरात हळहळ

मूल तालुक्यातील टेकाडी येथे झाले होते प्राथमिक शिक्षण

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील टेकाडी गट ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या सादगड येथील आशिष जर्नाधन मंगाम वय 27 वर्षे या आर्मीतील युवा सैनिकाचे नुकतेच निधन झालेे. आशिषच्या पोटात दुखत असल्याची माहिती आर्मी विभागाच्या अधिकाÚयांनी आशिषच्या परिवाराला दिली होती. त्यानंतर मृत्यु झाल्याची माहितीही देण्यात आली आहे.

अतिशय होतकरू व खेळात तरबेज असलेल्या आशिष जनार्धन मंगाम यांची 2014 मध्ये झालेल्या आर्मीच्या सैनिक पदावर निवड झाली होती, तो त्याठिकाणी खेळासाठी प्रसिध्द होता, दिल्लीमध्ये आर्मीत सेवा देत असताना मेरठ येथे आलेला होता, दरम्यान त्याच्या पोटात दुखत असल्याने त्याना तेथील रूग्णालयात उपचारर्थ भरती करण्यात आल्याची माहिती परिवाराला देण्यात आली होती, त्यानंतर आज सकाळी त्याचा मृत्यु झाल्याची माहिती परिवाराला देण्यात आली आहे.

आशिषचे प्राथमिक शिक्षण मूल तालुक्यातील टेकाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण सावली येथे झाल्याचे सांगण्यात आले.

सदर युवा सैनिक हा अविवाहीत असुन त्याच्या मागे आई, वडील, भाउ आणि बराच मोठा आप्त परिवार आहे, युवा सैनिकाच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.