महाशिवरात्रि निमित्य चिमुर शहरात होणार शिवभक्तांचा गजर

स्थानिक कलाकार सादर करणार भक्ति गीते

प्रमोद मेश्राम चिमूर:- चिमुर क्रांती नगरीचे जागृत देवस्थान श्रीहरी बालाजी महाराज यांचे घोडारथ यात्रेच्या अनुषंगाने महाशिवरात्रिच्या पावन पर्वावर चिमुर शहरात प्रथमच शिवभक्तांचा गजर कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे.

श्रीहरी बालाजी महाराज भक्त मंडळ चिमुर च्या वतीने निखिल गटलेवार यांचे संकल्पनेतून महाशिवरात्रिच्या पावन पर्वावर १ मार्च 2022 रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीहरी बालाजी देवस्थान पटांगनात गजर शिवभकतीचा या भक्ति संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, स्थानिक कलावंता सोबत विदर्भातील नामवंत कालाकारांच्या यात समावेश असून गजर शिवभक्तांचा या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान ट्रस्ट, श्रीहरी बालाजी महाराज भक्त मंडळ, व श्रीहरी बालाजी महाराज बहुऊदेशीय संस्था यानी केले आहे