कॉंग्रेसचे नेते, मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांची उपस्थितीत
मूल (प्रतिनिधी) : राजकीयदृष्टया संवेदनशिल असलेल्या विरई ग्राम पंचायतचे सरपंच प्रदीप वाढई व काही ग्राम पंचायत सदस्यांनी महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर कॉंग्रेसचे नेते, मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन कॉंग्रेस पक्षाच्या खेम्यात प्रवेश केला आहे.
भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या मूल तालुका शाखेची बैठक ुमहाशिवराञीच्या शुभपर्वावर तालुका कॉंग्रेस कमेटीच्या कार्यालयात कॉंग्रेसचे नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, शहराध्यक्ष सुनिल शेरकी, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, महीला तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, बाजार समिती उपसभापती संदीप कारमवार, संचालक शांताराम कामडे, किशोर घडसे, माजी नगरसेवक विनोद कामडे, फिस्कुटीचे माजी सरपंच अनिल निकेसर, माजी नगरसेविका ललिता फुलझेले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील विरई ग्राम पंचायतचे सरपंच तथा माळी समाजाचे नेते प्रदीप वाढई, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद गेडाम, शशीकांत जेंगठे, बंडु शेंडे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केले.
सभेचे संचालन विनोद कामडी यांनी केले, उपस्थितांचे आभार धनराज रामटेके यांनी मानले यावेळी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.