82 वर्षीय शिक्षकानी संगीतात ठोकली धुम

शेकडो विद्यार्थ्यांनी दिली संगीत क्षेत्राची परिक्षा

मूल (प्रतिनिधी) : संगित क्षेत्रामध्ये मूल तालुका तसा मागासलेलाच, आवड असतानाही तज्ञ मार्गदर्शकांची वाहवा असल्याने अनेक विद्यार्थी जिल्हयाच्या ठिकाणी जावुन आपली आवड पुर्ण करीत आहे, मात्र संगीत शिक्षण मूल मध्ये मिळावे यासाठी मूल येथील एका 82 वर्षाच्या संगित शिक्षकांनी धुम ठोकत शेकडो विद्यार्थ्यांना संगित क्षेत्रातील अतिशय महत्वाची समजली जाणारी परीक्षा देण्यास भाग पाडुन त्यामध्ये त्यांना तरबेच केलेले आहे. अशा या शिक्षकांचे नाव भालचंद्र दामोधर धाबेकर असे आहे.

जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक भालचंद्र दामोधर धाबेकर हे वरोरा येथील स्व. विश्वनाथ मते यांच्याकडुन संगिताचे धडे घेतले, मूल तालुक्यात संगित क्षेत्रात पाहिजे तसे शिक्षणही मिळत नसल्याने अनेक पालकांनी धाबेकर गुरूजीना संगिताबद्दल मार्गदर्शन करण्याची विनंती केली, दरम्यान स्वतः मध्ये असलेले ज्ञान इतरांच्या कामात यावे म्हणुन गुरूजीने काही विद्यार्थ्यांना तबला, हार्माेनियम आणि गायनाचे धडे देण्यास सुरूवात केली, आतापर्यंत जवळपास 100 मुलांनी संगित क्षेत्रातील अतिशय महत्वाची मानली जाणारी परिक्षा देवुन उर्तीर्ण झालेले आहे, यामुळे संगितामधील राग, ताल आता मूल शहरात दरवळायला लागला आहे, त्यांच्याकडे संगिताव्यतिरिक्त नवोदय आणि शिष्यवृत्ती परिक्षेच्या मार्गदर्शनाासाठी विद्यार्थी नेहमी येत असतात. त्यांच्या यात्रिसुत्री ज्ञानदानाच्या कार्यामुळे संगित क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे नाव मोठया आदराने घेतले जाते, देशात कोरानाची लाट सुरू असताना शैक्षणिक संस्था कायम बंद होत्या, यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित होते, याही काळात वयाचे 82 वर्षे पार केलेल्या व चालायला काठी घेतल्याशिवाय पर्याय नाही, अशाही स्थितीत धाबेकर गुरूजीनी आलेल्या मुलांना दहा वाय दहाच्या एका खोलीत बसवुन त्यांना धडे देत असत.

आता शिष्यही करतात मदत
संगित क्षेत्रातील ज्ञान अवगत करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी संगित क्षेत्रातील तबला विषारद किशोर पेंदाम, हार्माेनियम विषारद अवताडे, आणि योगेश्वरी देउरमले यांनी येवुन मदत करतात.

सेवाकाळात मिळाले अनेक पुरस्कार
धाबेकर गुरूजी यांचा जन्मत यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यात येत असलेल्या चिखली येथे झाला, त्यांचे प्राथमिक शिक्षण चिखली येथेच झाले आणि इतत्ता 8 ते दहावीपर्यंत चंद्रपूर येथील लोकमतान्य टिळक विद्यालययात झाले. 1961 मध्ये त्यांची सहायक शिक्षक म्हणुन गोंडपिपरी तालुक्यातील धामनगाव येथील जिल्हा परिषद प्राथिमक शाळेत नियुक्ती झाली. त्यांनी सलग 38 वर्षे सेवा देउन सेवानिवृतत झाले, यासेवाकाळात त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले