गंगामाता देवस्थानाच्या भव्य मंदिराच्या बांधकामाचे भूमीजन सम्पन्न

बळीराम काळे जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील माराईपाटण गंगामातेचे लोकप्रिय देवस्थान आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात सर्वदूर परिचित आहे.

गंगामाता हे माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील समस्त आदिवासी समाज बांधवांचे प्रिय आराध्यदैवत आहे. पूजनामध्ये गंगामाताला पहिले स्थान दिले जाते. विशेष म्हणजे शेतकरी बांधव कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गंगामातेचे पूजन करूनच पुढील कार्याची सुरुवात करतात. कोणतेही विघ्न, बाधा न येता कार्य पूर्णत्वास जावे म्हणून मातेचे पूजन करून त्याचे शुभ आशीर्वाद घेतले जातात.

इ.स. १९६२ ला पूजारी जंगू कोटनाके यांनी गंगामातेचे छोटेसे मंदिर निर्माण केले. त्या मंदिरावर पुरातन काळापासून पाहिले गवत व आता टिनाचे छत होते. पुजारी जंगु कोटनाके हे मय्यत झाल्यापासून आता त्यांचा मुलगा यादवराव जंगु कोटनाके, माराईपाटण हे पुजारी म्हणून काम पाहतात.आदिवासी बांधवांसाठी तालुक्यात जंगूबाई देवस्थान व गंगामाता देवस्थान हे दोन धार्मिक स्थळ प्रिय आहेत. ही देवस्थाने निसर्गाच्या सानिध्यात वसलेली आहेत.

पुजारी यादवराव कोटनाके, उद्घाटक तिरू. लिंगु पाटील कुमरे, रमेश पाटील कोटनाके यांच्या हस्ते गंगामाता मंदिराचा भूमिपूजन सोहळा सम्पन्न झाला. गंगामाता देवस्थान येथे लोकवर्गणीतून मंदिर बांधकाम (निर्मिती) करण्याचे सर्व समाज बांधवांनी ठरविले आहे.

मंदिर निर्माण समितीत अध्यक्ष लक्ष्मीकांत केशवराव कोटनाके, सचिव पितांबर करपते व समस्त समाज बांधव यांचा समावेश आहे. लोकवर्गणीतून मंदिर बांधकाम करण्यासाठी अधिकृत स्वयंसेवकांची नियुक्ती करून वर्गणी गोळा करून मंदिराचे बांधकाम करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले..

यावेळी महाराष्ट्र, तेलंगणातील आदिवासी समाज बांधव, जिवती तालुक्यातील गंगामाताप्रेमी व गंगामाता देवस्थान पुजारी यादवराव पाटील कोटनाके व कोटनाके परिवार व समस्ता समाज बांधव उपस्थित होते.