गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक असे ब्रिदवाक्य घेऊन संघटन वाढवा : नितीन येरोजवार

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या सभेत आवाहन

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यात शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच आणि 26 ग्राम पंचायत सदस्य निवडुण आलेले आहेत, भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालीकेची निवडणुक होणार आहे, यादृष्टीने तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा, आणि घर तेथे शिवसैनिक असे ब्रिदवाक्य घेवुन संघटन वाढवावे असे आवाहन शिवसेनेचे मूल तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी केले. ते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेच्या वतिने मूल येथे आयोजीत सभेत बोलत होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदिप गिÚहे होते, प्रमुख अतिथी म्हणुन शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन येरेाजवार, उपतालुकाप्रमुख रवि शेरकी, सत्यनारायण अमरूदिवार शहर प्रमुख राहुल महाजनवार, ,शहर समन्वयक अरविंद करपे, महीला आघाडी तालुकाप्रमुख रजनी झाडे, आदी उपस्थित होते.

नगर पालीकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाÚयांनी आताच कामाला लागुन प्रत्येक प्रभागात सभेचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांनी केले अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही असा सुचक इशाराही यावेळी पदाधिकाÚयांना दिले.

चांदापूर येथील तंटामुक्त समितच्या अध्यक्षपदी उपतालुका प्रमुख रवि शेरकी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सभेचे संचालन युवासेना तालुकाप्रमुख संदीप निकुरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवासेना सरचिटणीस विनोद काळबांधे यांनी मानले. सभेला शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.