मूल-चंद्रपूर मार्गावर दुचाकीचा अपघात: 1 इसम ठार

मार्कंडा वरून देवदर्शन करुन परत जात असताना झाडाला दुचाकीची धडक

मूल (प्रतिनिधी) : मार्कंडा देवस्थान येथुन नागाळा येथे जात असतांना जानाळा जवळील एका झाडाला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी 9.45 वाजता दरम्यान घडली. दिपक खोब्रागडे वय 29 वर्षे असे मृतकाचे नांव आहे.

महाशिवरात्री निमीत्य मार्कंडा येथे मोठी यात्रा भरते याठिकाणी नागाळा येथील दिपक खोब्रागडे हा मंगाळवारी दुचाकी क्रं. एम एच 34 ए आर 5240 ने दर्शनासाठी गेला होता, रात्रौ तो मुक्काम करून बुधवारी सकाळी तो परत येत असताना जानाळा बस स्थानकाजवळील एका सागाच्या झाडाला दुचाकीची धडक बसल्याने तो जागीच ठार झाला.
घटनास्थळावर मूल पोलीस दाखल झाले असुन पुढील तपास करीत आहे.