चुलत सासऱ्याला दगडाने ठेवुन केले ठार

यवतमाळ जिल्हयात खुनाचे सत्र सुरूच

आर्णी (प्रतिनिधी) : गेल्या दोन महिण्यापासुन यवतमाळ जिल्ह्यातील खुनाचे सत्र सुरू आहे, दरम्यान शुक्रवारी रात्री आर्णीत जावयाने चुलत सासऱ्याला दगडाने ठेचून ठार केल्याची घटना घडली, सय्यद रशीद सय्यद मुसा रा. मोमीनपुरा असे मृताचे नाव आहे.

सय्यद रशीद हे आर्णीत हमालीचे काम करीत होते. त्यांचा चुलत जावई जावेद अली किस्मत अली ऊर्फ छोटू कबुतर ( रा. कुरेशीपुरा, यवतमाळ) याच्यासोबत वाद झाला. शुक्रवारी रात्री सासरे-जावई माहूर चौकातील एका अवैध दारू भट्टीवर दारू पिण्यासाठी गेले होते. तेथे सय्यद रशीद याने जावयाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आरोपी जावेद हा त्याची पत्नी व सासऱ्याला त्रास देत होता. जावेदच्या जाचामुळेच त्याची पत्नी वडिलांच्या घरी राहत होती. समजूत घालत असलेल्या सय्यद रशीद याच्याशी वाद घालत जावेदने त्यांच्यावर दगडाने हल्ला केला. दगडाने डोके फोडल्यावर छाती व पोटावरही दगड घातला.

हा प्रकार रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडला. आरोपीने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आर्णी ठाणेदार पितांबर जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आरोपी कोण हे उघड होताच त्याचा शोध घेणे सुरू केले. अर्ध्या तासात आर्णी शहरातील बोरबनमध्ये दडून बसलेल्या जावेदला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पितांबर जाधव, सहायक निरीक्षक किशोर खंदार, दिनेश जाधव, अमित झेंडेकर, मिथुन जाधव, मनोज चव्हाण, विजय चव्हाण यांनी केली.