अंगणवाडी, शाळा आणि गरजु व्यक्तींना ग्राम पंचायतकडुन साहित्य वाटप

विरई ग्राम पंचायतचा स्तुत्य उपक्रम

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील विरई ग्राम पंचायतच्या वतिने गरजु लाभार्थ्याना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधुन नुकताच विविध साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विरई ग्राम पंचायतचे सरपंच प्रदिप वाढई होते, प्रमुख अतिथी म्हणुन तालुका कृषी विभागाचे मंगळ अधिकारी शंतनु तिजारे, कृषी पर्यवेक्षक रविशंकर उईके, उपसरपंच विभा उराडे, सदस्य अनिता वसाके, छबीलदास गोवर्धन, किरण ठाकरे, शशिकांत जेंगठे, शोभा गेडाम, मिनाक्षी भोयर, पोलीस पाटील लताबाई वसाके, तंटामुक्त समिती अध्यक्ष रविंद्र येनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंधराव्या तित्त आयोगाच्या निधी मधुन अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांना तबला, मंडप पल्ला, ग्रिन मॅट, माईक संच, वाटप करण्यात आले, अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्याना मोठे गंज व झाकणी,, 4 अंगणवाडी केंद्राना प्रत्येकी 1 गॅस जोडणी, दिव्यांग 19 लाभार्थ्यांना ब्लॅकेट व चादर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला खेळाचे साहित्य, आणि प्रत्येक कुटुबातील किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विरईचे ग्रामसेवक के टी रामटेके यांनी केले. संचालन दत्तु निकोउे यांनी केले तर उपस्थितांचे आभार देवानंद वाढई यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी महेश मोहुर्ले, संदिप ढोले, सदानंद सोनुले यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.