… तर तुमचं रेशन कार्ड रद्द होणार ; एक चूक महागात पडणार

जाणून घ्या नवा नियम

नवी दिल्ली : तुम्ही रेशन कार्डचे लाभार्थी आहात, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकार त्यांच्याकडे असलेली रेशन कार्ड धारकांची यादी वेळोवेळी अपडेट करतं. यात काही गडबड आढळून आल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येतात.
तुम्ही बराच काळ रेशन कार्डचा वापर केला नसल्यास ते रद्द केलं जाऊ शकतं.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य पुरवलं जातं. नागरी पुरवठा प्रणालीच्या अंतर्गत कुटुंबात असलेल्या सदस्य संख्येच्या आधारे अतिशय स्वस्त दरांत सरकार लोकांना रेशन उपलब्ध करून दिलं जातं. गरिब कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा उद्देश यामागे आहे.

तुम्ही कोणत्या महिन्यांत किती रेशन घेतलं, तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत अशी माहिती रेशन विभागाकडे उपलब्ध असते. त्या माहितीच्या आधारे विभागाकडून वेळोवेळी रेशन कार्डधारकांची यादी अपडेट केली जाते. बऱ्याच महिन्यांपासून वापरात नसलेली रेशन कार्ड रद्द केली जातात.

नियम नेमका काय?
एखादा रेशन कार्ड धारक सहा महिन्यांपासून रेशन घेत नसेल, तर त्याला स्वस्त दरातील धान्याची गरज नसल्याचं सिद्ध होतं, असा नियम आहे. त्यामुळे एखादं कुटुंब सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रेशन घेत नसल्यास त्यांचं रेशन कार्ड रद्द केलं जातं.

रेशन कार्ड रद्द झाल्यावर ते पुन्हा ऍक्टिव्ह करायचं असल्यास एक सोपी प्रक्रिया आहे. त्यासाठी तुमच्या राज्यातील AePDS च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन काही तपशील भरावा लागतो. संपूर्ण भारतासाठी असलेल्या AePDS रेशन कार्ड पोर्टलवरही तुम्ही रेशन कार्ड ऍक्टिव्ह करू शकतात.