पोहायला गेलेले चार युवक नदीत बुडाले

दोन जणाचा मृत्यु : दोघांना वाचविण्यात नागरीकाना यश

हिंगणघाट (प्रतिनिधी) : आजनसरा येथुन पिपरी येथे जाण्यासाठी निधालेल्या 4 तरूणांना हिवरा येथील वर्धा नदीवर पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने 2 जणाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाले तर दोघाना सुखरूप बाहेर काढण्यात नागरीकांना यश आले आहे. सदर घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. रुतीक नरेश पोखळे (वय‌ 21 वर्ष) आणि संघर्ष चंदुजी लढे (वय 16 वर्ष), यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर रणजित धाबर्डे आणि शुभम सुधारकर लढे या दोघांना नागरिकांनी सुखरुप बाहेर काढलं.

हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथुन रूतीक पोखळे, संघर्ष लढे, शुभाम लढे आणि रणजित धाबर्डे हे युवक पिपरी येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. दरम्यान हिवरा इथल्या वर्धा नदीवर पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. पोहत असताना या चौघांना नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही. परिणामी चारही तरुण बुडाले. याची माहिती मिळताच हिवरा इथल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या चौघांपैकी रणजित धाबर्डे आणि शुभम सुधारकर लढे या दोघांना यांना पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आलं. परंतु इतर दोघांचे मृतदेह शोधण्याचं काम अद्याप सुरु आहे.