युवा शेतकऱ्याची कमाल
✍️ नुतन गोवर्धन, मूल : रब्बी हंगामात धान पिकाची शेती करून खरीप हंगामातील केवळ दिड एकर शेतामध्ये 4 महिण्यात कांदाचे उत्पादन घेवुन सुमारे 2 लाखाच्या वर उत्पन्न मूल तालुक्यातील चिमढा येथील युवा प्रगतीशील शेतकरी युवराज चौधरी हे घेत आहेत, त्यांच्यापासुन अनेक तकरी प्रेरणा घेत नवनविन पिकाचे उत्पादन शेतात घेत असल्याने समाधान व्यक्त केल्या जात आहे.
मूल तालुक्यातील चिमढा येथील शेतकरी युवराज रूषीदेव चौधरी यांचे वडीलोपार्जीत शेती कुकुडचिमढा येथे आहे, 5 एकर शेतात त्यांनी रब्बी हंगामात धान पिकासह भाजीपाल्याचे उत्पन्न घेत असतात, जैविक किटकनाशकाचा वापर करत त्यांनी लाखो रूपयाचे उत्पन्न रब्बी हंगामात घेतात, रब्बी हंगामातील उत्पन्न निघाल्यानंतर खरीप हंगामात ते दिड एकर शेतात कांदाची लागवड करतात यासाठी त्यांनी आधीच सर्व नियोजन करीत असल्याने लागवड करण्यासाठी जास्त काही त्रास होत नाही.
दिवसेंदिवस मजुर मिळणे दुरपास्त झाले आहे, यामुळे चौधरी यांनी शेतात असलेल्या विहीरीला 5 एच पीची मषीन लावुन ठिंबक सिंचन व्यवस्था उभी केली आहे. कांदयाची लागवड केल्यानंतर साधारण महिण्याभरापासुन कांदयाची पात विक्री करतात, अनेक वर्षापासुन कांदा पिकाचे उत्पन्न घेत असल्यामुळे परीसरातील नागरीकांना माहिती आहेे यामुळे घरीच पात घेण्यासाठी नागरीक येतात, घरूनच कांदयाची पात विक्री होत असल्याने विक्रीही सहज होत आहे. सदरचे उत्पन्न घेण्यासाठी पत्नीचाही मोठा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले.
कांदयाच्या सोबतीला मिरची
कोणत्याही मनुष्यबळाचा वापर न करता दिड एकर शेतात कांदाचे उत्पादन तर लागुनच अर्धा एकर शेतात मिरची उत्पादन मागील अनेक वर्षापासुन सदर शेतकरी घेत आहे, एकाचवेळी दोन्ही पिक घेत असल्यामुळे उत्पन्नातही चांगलाच फायदा होत असल्याने शेतकरी युवराज चौधरी यांनी दे धक्काषी बोलताना सांगीतले.
कांदा विक्रीचाही पर्याय शेतकऱ्याकडे
पैस्याची अति गरज पडल्यास कांदाची पात विक्री न करता कांदा काढुन विक्री करता येवु शकतो, यामुळे कांदयाचे उत्पादन हे हमखास असल्याने शेतकरी युवराव चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.






