नेटवर्क मार्केटिंगसाठी विनापरवानगी विदेशवारी करणे भोवणार
मूल (प्रतिनिधी) : विदेशात जाण्यासाठी जिल्हा परिषदेकडुन परवानगी न घेता नेटवर्क मार्केटींगच्या व्यवसायात ‘आकाश’भरारी घेणाऱ्या त्या शिक्षकाने विदेशात जाऊन आल्याने, त्यांच्याकडुन सेवाशर्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्या शिक्षकांकडुन शिक्षणाधिकाऱ्यांनी 2 आठवडयात त्यांच्याकडुन खुलासा मागीतला असुन दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची विश्वनिय माहिती आहे. यामुळे विनापरवागी विदेशवारी करणाऱ्या शिक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहुनही झटपट पैस्सा कमविण्याच्या लालसेपोटी मूल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक ऑस्ट्रेलिया मधील एका कंपनी मध्ये नेटवर्क मार्केटींगचा व्यवसाय करण्यात गुंतलेला आहे, सदर व्यवसायात त्यांने चांगलीच आकाशभरारी घेतल्याने त्याला कंपनी कडुन विदेश दर्शन घडवुन आणण्यात आले, शिक्षक पेक्षात काम करीत असताना संबधीत विभागाची परवानगी घेवुन विदेशात जाणे गरजेचे आहे, मात्र सदर शिक्षकाने शिक्षण विभागात केवळ अर्ज सादर केला, मात्र वरिष्ठाच्या परवानगीची त्याला गरज वाटली नाही आणि विनापरवागी तो विदेशवारी करून आले. याबाबत दे धकका एक्सप्रेस मध्ये मागील अनेकदा वृत्त प्रकाशित करण्यात आले, वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी मुख्यकार्यपालन अधिकाऱ्याना पत्र देवुन विना परवानगी विदेशवारी करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती मध्येही समिती सदस्य पृथ्वीराज अवताडे यांनी मुद्दा उपस्थित करीत विदेशवारी करणाऱ्या त्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी रेटुन धरली. जानाळा येथील धनराज रामटेके यांनीही विदेशवारी करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी भक्कम पुरावे सादर करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर तक्रारीवरून जिल्हा परिषदेतील शिक्षाणाधिकारी खांडरे यांनी जिल्हयातील सर्व गटशिक्षाणिकारी यांना अहवाल मागीतला, अहवाल प्राप्त झाल्यानंतर 4 मार्च रोजी विनापरवानगी विदेशवारी करणाऱ्या शिक्षकांकडुन 2 आठवडयात खुलासा मागीतला आहे. यामुळे त्या आकाशभरारी घेणाऱ्या शिक्षकांसह विनापरवागी विदेशवारी करणाऱ्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
व्यवसाय दाखवून विदेशात जाण्याची परवानगी काढणाऱ्या त्या शिक्षकाच्या अडचणीत होणार वाढ
पेशाने शिक्षक असतानाही केवळ नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय करून विदेशात जाण्यासाठी व्यवसाय दाखवुन परवानगी मिळविणारा तो शिक्षक याप्रकरणात चांगलाच गुंतलेला असुन त्याच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.