नगर परिषदांच्या निवडणूक प्रारुप प्रभाग रचना व नकाशाबाबत हरकती व सूचना आमंत्रित

17 मार्चपर्यंत स्वीकारल्या जातील सूचना

चंद्रपूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, चिमूर, मूल, राजुरा, घुग्घुस, व नागभीड या नगर परिषदांच्या आणि भिसी या नगर पंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास 7 मार्च रोजी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार उपरोक्त नगर परिषदा व नगर पंचायतीमधील प्रारुप प्रभाग रचना व प्रभागदर्शक नकाशावर हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. 10 मार्च ते  17 मार्चपर्यंत संबंधित नगर परिषद / पंचायत कार्यालयात हरकती व सूचना सादर करता येतील. प्राप्त हरकती व सुचनांवर जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे 22 मार्च पर्यंत सुनावणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी कळवले आहे.