वैचारिक समतेवर महिलांची जडनघडण महत्वाची : सहा. पोलीस निरीक्षक प्राची राजूरकर

विसापुरात महिलादिनी व्याख्यानमाला

विसापूर  (प्रतिनिधी)  : आजघडीला स्त्री स्वातंत्र धोक्यात आल्याचे दिसते.समाज व्यवस्थेत समानता नाकारली जात आहे.तीचे समाजातील दुय्यम स्थान नाकारण्याचे बळ दिसत नाही. याला कारणीभूत सामाजिक व भावनिक जडणघडण आहे. पुरुषी मानसिकता आता बदलण्याची गरज आहे.शिक्षण यात महत्वाचे आहे. यामुळे वैचारिक जडणघडण महिलांच्या जीवनात महत्वाचे आहे, असे मत बल्लारपूर येथील सहायक पोलीस निरीक्षक प्राची राजूरकर यांनी विसापूर येथे व्यक्त केले.

विसापूर येथील जय दुर्गा महिला भजन मंडळाच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज, सार्वजनिक मंचावर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व्याख्यान माला व बाल कीर्तनकार तुलसी हिवरे यांचे प्रबोधन कार्यक्रम पार पडला. यावेळी मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक जोत्स्ना मोहितकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून स्त्री रोग तज्ञ डाँ. स्वेता मानवटकर, बल्लारपूर, अधिवक्ता संघ अध्यक्ष अड. मेघा भाले, सरपंच वर्षा कुळमेथे, सामाजिक कार्यकर्त्या कविता बुटले, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, सत्कारमूर्ती शकुंतला चौधरी, जय दुर्गा महिला भजन मंडळाच्या अध्यक्ष मंजुषा पावडे, ग्रामपंचायत सदस्य विद्या देवाळकर यांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल जय दुर्गा महिला भजन मंडळाच्या माजी अध्यक्ष शकुंतला चौधरी व अध्यक्ष मंजुषा पावडे, अमोल भोयर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. डाँ. स्वेता मानवटकर यांनी स्त्रीच्या जिवशास्त्रीय आणि सामाजिक स्थानाबद्दल मार्गदर्शन केले. अड. मेघा भाले यांनी महिलाविषयक कायद्याबद्दल अवगत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, संचालन अर्चना टोंगे यांनी तर आभार निकिता आडकीने यांनी मानले. बाल कीर्तनकार तुलसी हिवरे यांनी महापुरुष व संताच्या विचारावर प्रबोधनात्मक कीर्तन सादर करून अबालवृद्धाना मंत्रमुग्ध केले.