निमणी ग्रामपंचायतीला आय एस ओ मानांकन प्राप्त

बाखर्डी प्रतिनिधी:- कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या निमणी ग्रामपंचायतीला न्यूग्रो सर्टिफिकेशन नागपूर द्वारे आय एस ओ ऑडिटर रुपेश राऊत यांच्या हस्ते आय एस ओ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

यावेळी निमणी ग्रामपंचायत सरपंच सीमा जगताप उपसरपंच उमेश राजूरकर ग्रामसेवक शुभांगी डी ढवळे ग्रामपंचायत सदस्य मारोती कोडापे गिरजाबाई गोबाडे सुनंदा टोंगे पुरुषोत्तम कोडापे सुमन जगताप अश्विनी टेकाम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ग्रामपंचायत निमणी सर्व निकषावर खरी उतरली आहे न्यूग्रो सर्टिफिकेशन नागपूर द्वारे आयएसओ मानांकन पथकाने केलेल्या पाहणीत निमणी ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत ग्रामपंचायतीचे नियमित दप्तर व आर्थिक तपासणी ऑडिट ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कक्षाची मांडणी ग्रामसभेला गावकऱ्यांची उपस्थिती कोव्हिडं लसीकरण यशस्वी मोहीम गावाची स्वच्छता रस्ते अंगणवाडी शैक्षणिक सेवा सुविधा पाणीपुरवठा आरोग्य आदींची पाहणी करून गुणांकन ठरविले ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजना व उपक्रम राबवून गावांचा सर्वांगीण दृष्ट्या विकास साधत असतांना ग्रामपंचायतीने सामाजीक बांधिलकी जपत केलेले कार्य व राबविलेले उपक्रम शासकीय कामातील सहभाग वाखाण्याजोगा राहिला आहे

यावेळी आय एस ओ ऑडिटर शुभम मारबते अमित ढेंगरे मोतीराम पाटील शुद्धोधन जगताप आतिष पिदूरकर कॉम्प्युटर ऑपरेटर प्रफुल मोरे शिपाई भीमराव टेकाम आदी उपस्थित होते

उमेश राजूरकर उपसरपंच ग्रामपंचायत निमणी:- ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे गेल्या पाच वर्षात विकासाची कामे चालू आहे आय एस ओ नामांकन मिळाल्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा लागला असून चांगल्या कामाची पावती मिळाली आहे पुढे देखील गावाच्या विकासासाठी अशाच पद्धतीने आमदार सुभाष धोटे व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाचा विकास केला जाईल निमणी गावाला तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील आदर्श गाव करण्याचा यापुढे प्रयत्न राहील