महिलांवरील अन्यायाच्या विरोधात एकजुटीने उभे राहा : संगिता ठेंगणे

जागतीक महीला दिनानिमीत्त सन्मान स्त्री कर्तुत्वाचा कार्यक्रम संपन्न

दाताळा (प्रतिनिधी) : पुरूषांच्या बरोबरीने उभे राहुन महिला वेगवेगळया क्षेत्रात कार्य करीत आहेत, कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना महिलांवर नेहमीच अन्याय होत असतो, यामुळे महिलांनी न घाबरता अन्यायाविरोधात उभे राहुन कार्य करावे असे आवाहन झाशीची राणी महीला ग्रामसंघाच्या अध्यक्षा संगीता ठेंगणे यांनी केले. त्या झाशीची राणी महिला ग्रामसंघ आणि महिला बचत गट दाताळाच्या पुढाकारातुन जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन सन्मान स्त्री कर्तुत्वाचा सत्कार सोहळा व विविध कार्यक्रम सोहळयात बोलत होते.

कार्यक्रमाच्या झाशीची राणी महीला ग्रामसंघ दाताळाच्या अध्यक्षा संगीता ठेंगणे, सिमा विरुटकर, प्रेरणा युज्ञुरवार, प्रिया सेलोकर, अश्विनी रामटेके, छाया राऊत, गंगा पांडे, सुरेखा क्षिरसागर, अनिता मोहुर्ले, माधुरी हिवरकर, अर्चना नांदुरकर, आशा वर्कर हिवरकर ताई, जवादे ताई उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ, शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. महीलांच्या विविध प्रकारच्या स्पर्धा सुध्दा घेण्यात आल्या. गावातील उत्कृष्ठ काम करण्याÚया महीलांचा सत्कार तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन कल्याणी देवाळकर तर आभार प्रदर्शन कविता कुडे यांना केले. याप्रसंगी गावातील अनेक स्त्रीया तसेच महीला बचत गटांच्या महीला उपथित होत्या.