चंद्रपूर मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

दोन जण गंभीर जखमी

मूल (प्रतिनिधी) : चंद्रपूर-मूल मार्गावरील जानाळा जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी 3.15 वाजता दरम्यान घडली. सुधाकर भगत वय 40 वर्षे, प्रविण लोनबले वय 45 वर्षे रा. चंद्रपूर असे जखमींचे नांव आहे.

चंद्रपूर येथील सुधाकर भगत आणि प्रविण लोनबले हे दुचाकी वाहन क्रं. एम एच 34 बि के 8376 या वाहनाने जात असताना मूल -चंद्रपूर मार्गावरील जानाळा पासुन 200 मिटर अंतरावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली यात, सुधाकर भगत वय 40 वर्षे आणि, प्रविण लोनबले वय 45 वर्षे रा. चंद्रपूर हे गंभीर जखमी झाले आहे. सदर घटनेची माहिती मूल पोलीसांना मिळताच, मूलचे वाहतुक शिपाई महेश वाघे यांनी जखमीना टॅक्सनी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पुढीत तपास मूल पोलीस करीत आहे.