बँंकेचे अधिकारी व कर्मचारी कौतुकास पात्र
चंद्रपूर (प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती वादात सापडली आहे.चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करा ,अशी मागणी संसदेत केली.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकर्यांची बँक आहे.बँकेत सर्व काही पारदर्शक सूरू असल्याचे बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी म्हटले आहे.
बँकेचे सन २०१२ ते २०१७ पर्यंत बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर सहकार कायदयानुसार बैंकेने निवडणुक पार पाडण्याकरीता निवडणुक प्राधिकरणाकडे कार्यवाही केलेली आहे. सोबतच सीबीआय चौकशी ही जेष्ठ संचालकांचीच मागणी होती, हे महत्वाचे आहे.
त्या अनुशंगाने निवडणुक प्राधिकरणाकडे निवडणुक कार्यक्रम जाहिर केला. सदर निवडणुक कार्यक्रमामधे प्रारुप व अंतीम यादी ची कार्यवाही चालू असतांना मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपुर यांच्याकडे पीटीशन दाखल करण्यात आली. त्या अनुशंगाने बैंकेचे संचालक मंडळ यांनी बँकेची निवडणुक प्रक्रिया त्वरीत राबवावी म्हणुन मा. संचालक मंडळ सभा हि २७/७/२०१७ चे ठराव क्रं. १५ (१) ला निर्णय घेऊन न्यायालयात निवडणुक त्वरीत घेण्याकरीता बँकतर्फे वकील उभा केला. बँकेतर्फे वकील देवून माहिती सादर केली. सदर प्रकरण मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपुर येथे न्यायप्रविष्ठ आहे.
तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र २८/१२/२०२० रोज सोमवार अनुशंगाने जूनेच संचालक मंडळ कार्यरत आहे. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र सोमवार डीसेंबर २८, २०२०/ पौष ७, शके १९४२ नुसार सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रं. २४ यांच्या कलम १५४ ब-१९ ची सुधारणा ५, मुख्य अधिनियमाच्या कलम १५४ ब-१९ मधील, पोट कलम (३) मधे, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येइल, यानुसार “जर संस्थेच्या समितीची निवडणुक, अशा संस्थेच्या समितीच्या सदस्यांना जवाबदार धरता येणार नाही अशा कोणत्याही कारणासाठी घेतली जाऊ शकत नसेल तर, समितीचे विदयमान सदस्य, नविन समिती यथोचितरीत्या घटीत होईपर्यंत, नियमितपणे सदस्य असल्याने मानण्यात येतील.”
चंद्रपुर जिल्हा मध्य. सह. बँंकेच्या एकूण ८२ शाखा व ११ पे. ऑफिस असे एकूण ९३ शाखा ग्रामीण स्तरावर सुध्दा कार्यरत आहे. बँकेची उलाढाल ४५३९.८८ कोटी इतकी आहे. बँकेचे सन २०२१ चे ग्रॉस एन.पी.ए. १३.७१ टक्के व नेट एन.पि.ए. ५.७५ टक्के इतके आहेत. बँकेचे स्टॉफिन्ग पैटर्न प्रमाणे ८८५ कर्मचा-यांनी गरज असुन सध्या बँकेत ५१३ इतके कर्मचारी कार्यरत आहे, एकूण ३७२ कर्मचारी कमी आहे. कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे बँक शाखा बंद करायची वेळ आलेली आहे.
तसेच आस्थापना खर्चाचे प्रमाण २ टक्के १.५० टक्के च्या आंत म्हणजे १.२४ आहे. बँकेच्या शाखा ग्रामीण भागात कार्यरत आहेत. त्यामुळे बँकेच्या कार्यरत कर्मचा-यावर कामाचा अतिरीक्त ताण पडत आहे. सोबत दैनिक कामकाज सुध्दा प्रभावित होत आहे. तरी इतका कमी संख्येत बँकेत कर्मचारी कार्यरत असतांना बँक आज तारखेला ३.३९ कोटी नफ्यामधे आहे. व एन.पी.ए. १३.७१ आहे. बँकेला नौकर भरती नाबार्ड, आर.बी.आय. सहकार आयुक्त यांचे मानव संसाधन पॉलिसी नुसार शासनाकडे पाठविला असता शासनाने नौकर भरतीकडे परवानगी दिलेली आहे. बँकेने बँकेच्या हिताच्या दृष्टिने वेळोवेळी कायदेशीर कार्यवाही केलेली आहे.
त्यामुळे बैंकेनी केलेली कार्यवाही ही कायदेशीर कार्यवाही आहे. तसेच या अगोदर महाराष्ट्र शासनानी यवतमाळ जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक मंडळाचा कार्यकाळ संपलेला असतांना सुध्दा नौकर भरतीस परवानगी शासनाने दिलेली आहे. व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेला नौकर भरती पुर्ण झालेली आहे.
मागील एका वर्षात बँंकेने मोठी प्रगती साधली आहे. मार्च २०२० अखेर बँंकेच्या ३१८१ कोटी मधे २१९ कोटीने वाढ होवून दि.३१ मार्च २०२१ रोजी बैंकेच्या ठेवी ३४०० कोटी आहे. ३१ मार्च २०२० अखेर बँकेचा सकल एन.पी.ए. २७.५६ टक्के व निव्वळ एन.पी.ए. २१.९९ टक्के होता. मार्च २०२१ मधे अखेर एन.पी.ए. १३.८५ टक्के नी कमी होवून सकल एन.पी.ए. १३.७१ टक्के व निव्वळ एन.पी.ए. ५.७५ टक्के वर आलेला आहे. खरीप हंगाम सन २०२१-२२ करीता ६८४६२ शेतक-यांना रु. ५१२.४७ कोटी पिक कर्ज वाटप केले आहे. शेतकरी कल्याण निधी आंतर्गत ३५७ शेतकरी/शेतमजुर यांना विविध दुर्धर आजाराकरीता रु. ६८ लाख आर्थिक मदत करण्यात आली. स्व. राजीव गांधी स्वावलंबी योजनेअंतर्गत लघूव्यावसाईकांना विनातारण रु. ५०,००० पर्यंत १५६७ सभासदांना रु.७ कोटी ८० लाख कर्ज वाटप करण्यात आले. सन २०२१-२२ या आर्थीक वर्षात बँकेच्या ९३ शाखांमधील ६००९ बचत गटांना रु. ७० कोटी ३७ लाख कर्जवाटप केले. बचत गट कर्ज वाटप सन २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षाचे ३ टक्के व्याज परतावा रु. २ कोटी ३५ लाख व्याज अनुदान बँकेला प्रथमत: प्राप्त झाले आहे व गटाला वितरीत करण्यात आलेले आहे.
अशा परीस्तितीत बँंकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी कौतुकास पात्र असल्याचे बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यानी सांगितले.