चंद्रपूर मार्गावर हायवा आणि ट्रॅकचा अपघात

चालक जखमी, आठ दिवसात तिसरा अपघात

मूल (प्रतिनिधी) : चंद्रपूर-मूल मार्गावरील जानाळा जवळ ट्रॅक आणि हायवाची समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही वाहन चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 5 वाजता दरम्यान घडली.

चंद्रपूर वरून मूल कडे येणारा ट्रॅक क्रं. एम एच 34 बीजी 3878 आणि मूल वरून चंद्रपूरकडे जाणारा हायवा क्रं. एम एच 34 बी जी 7299 या दोन वाहनामध्ये जानाळा जवळ समोरासमोर धडक बसली, याघटनेमध्ये ट्रॅक आणि हायवाचे मोठे नुकसान झाले असुन दोन्ही वाहनाचे चालक जखमी झाले, जखमीना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

आठ दिवसात तिसरा अपघात
जानाळा पासुन अवघ्या 200 मिटर अंतरावर आठ दिवसात 3 अपघात घडले असुन यामध्ये एक व्यक्ती जागीच ठार झाला, तर अनेक गंभीर जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.