आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांचे जाहीर व्याख्यान

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व अ.भा. सरपंच परिषदेचा संयुक्त उपक्रम

अतुल कोल्हे भद्रावती :- दि. २३ मार्च रोज बुधवारला ११.३० वा. वरोरा येथील बावणे मंगल कार्यालय मोहबाळा रोड येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग ह्या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर उपक्रमाचे आयोजन स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचंद्रपूर आणि अखिल भारतीय सरपंच परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. ह्या जाहीर व्याख्यानाचा लाभ समस्त सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, पुरुष व महिला बचत गट सदस्य तथा पदाधिकारी, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते बंधू -भगिनिंनी घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अँड. मोरेश्वर टेमुर्डे तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यीक आचार्य ना. गो. थुटे व जिल्हा धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समितीचे जिल्हाध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून जि.प. माजी सभापती प्रकाश मुथा, मुंबई कृ. उ. बा. समितीचे माजी उपसभापती डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, चंद्रपूर लोकसभा शिवसेना विस्तारक नित्यानंद त्रिपाठी, सामाजिक कार्यकर्ते अँड. विजय मोगरे, तेली समाज संघटनेचे अध्यक्ष शंभुनाथ वरघणे, चंद्रपूरचे नगरसेवक पप्पु देशमुख, वरोराचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे उपस्थित राहील.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जि.प. चंद्रपूरचे माजी सभापती तुळशीराम श्रीरामे, वरोरा पं.स. चे माजी सभापती अँड. शरद कारेकर, अ.भा. सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, अ.भा. सरपंच संघटनेचे विदर्भ समन्वयक पारस पिंपळकर, आदर्श शेतकरी सुरेश गरमडे आणि महिला सल्लागार सदस्य तथा जिल्हा समुपदेशक योगिता लांडगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहील.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अ.भा. सरपंच संघटनेचे मार्गदर्शक अँड. देवा पाचभाई, वरोरा पं.स. चे माजी उपसभापती तथा संचालक कृ. उ. बा.स. चे संचालक दत्ता बोरेकर, सरपंच प्रदिप महाकुलकर, वरोरा न.प. चे माजी उपाध्यक्ष खेमराज कुरेकार, अ. भा. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कोपुला, शिवसेना भद्रावती तालुका प्रमुख भास्कर ताजने, अ.भा. सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, मुधोलीचे सरपंच बंडू पा. नन्नावरे, बिजोणीच्या सरपंच मनिषा रोडे, नंदोरी ( बु. ) चे उपसरपंच मंगेश भोयर, भद्रावती कृ. उ. बा.स. च्या उपसभापती अश्लेषा भोयर ( जिवतोडे ),युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांनी संयुक्तपणे केले आहे.