साप चावल्याने युवकाचा मृत्यु

टेकाडी येथील घटना

मूल (प्रतिनिधी): स्वतःच्या शेतामधील कुक्कुटपालन केंद्रावर गेलेल्या एका युवकाला विषारी सापाने दंश केल्यामुळे त्याचा चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्रौ 11 वाजता दरम्यान घडली. नरेश कलीदेव रामटेके वय 41 वर्षे रा. टेकाडी असे मृत्तकाचे नाव आहे.

मूल तालुक्यातील मौजा टेकाडी येथील नरेश कलीदेव रामटेके याला कुक्कुडचिमढा परिसरात दिड एकर शेती आहे, सदर शेतामध्ये त्यानी शेती करुन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता, यासाठी तो नियमीत शेतावर जात होता, शुक्रवारी तो कुक्कुटपालन केंद्रावर जाऊन काम करीत असताना दुपारी 5 वाजता दरम्यान त्याला अचानक एका विषारी सापाने दंश केल्याने त्याला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले, त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून चंद्रपूर रेफर करण्यात आले, चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा रात्रौ 11 वाजता दरम्यान मृत्यु झाला.

त्याच्या पश्चात आई आणि 3 भाऊ आहेत, त्याच्या अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.