शिवसेनेनी साजरा केला शिवजन्मोत्सव सोहळा
मूल (प्रतिनिधी): गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षी, त्याच जोमात त्याच उत्साहात पुन्हा भगवा ध्वज फडकावुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी प्रमाणे साजरी व्हावी हा मी ठरविलेला संकल्प आज उत्साहात साजरा होत असल्याचे पाहुन खरंच आनंद होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांची शिकवण प्रत्येकाच्या डोळयासमोर राहावा यासाठीच आपण शिवजयंती साजरी करीत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे मूल तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी व्यक्त केले. ते मूल तालुका शिवसेनेच्या वतिने आयोजीत केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमीत्य बोलत होते.
मूल येथील शिवसेना तालुका कार्यालयात सोमवारी दुपारी 12 वाजता आयोजीत केलेल्या कार्यक्रमांप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजा व माल्यार्पण शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे मूल तालुका उपप्रमुख रवी शेरकी, सत्यनारायण अमरूदिवार यांनी आपले विचार विषद केले.
यावेळी महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा अनेक महीला पुरूषांनी लाभ घेतला,
कार्यक्रमाचे संचानल युवासेना तालुकाप्रमुख संदिप निकुरे यांनी केले, उपस्थितांचे आभार विनोद काळबांधे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना तालुका समन्वयक तथा सुशीचे सरपंच अनिल सोनुले, महीला आघाडी तालुकाप्रमुख रजनी झाडे, शहरप्रमुख राहुल महाजनवार,
शहर समन्वयक अरविंद करपे, उपशहर प्रमुख प्रविण मोहुर्ले, योगेश राऊत ,बाला इन्नमवार, श्रीनिवास कन्नुरवार, आशिष गुंडोजवार, विजय भोयर यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी युवासैनिक, महीला आघाडी तसेच मुल तालुक्यातील शिवभक्त मोठया प्रमाणावर उपस्थित होते.






