खर्रा खावुन झाडाच्या कुंडीत थुंकण्याच्या प्रकाराकडे पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष

पंचायत समितीच्या इमारतीत घाणीचे साम्राज्य

मूल (प्रतिनिधी) : आरोग्याच्या हेतुने जनहित लक्षात घेता सुगंधित तंबाखु व गुटखावर शासनाने बंदी घाातलेली असतानाही खुद्द पंचायत समितीच्या इमारतीमध्ये मोठया प्रमाणावर खर्रा, गुटख्याचे सेवन करून सौंदर्यात भर घालण्यासाठी लावण्यात आलेल्या वृक्ष कुंडीमध्येच थुकल्या जात असल्याने पंचायत समिती इमारतीत दुर्गंधी पसरत आहे मात्र पंचायत समिती प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.

राज्याचे माजी अर्थमंत्री तथा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन मूल पंचायत समितीच्या इमारतीकरीता सुमारे 7 करोड रूपयाचा निधी मंजुर करून इमारतीचे काम पुर्ण करण्यात आले आहे, सदर इमारत बांधकाम पुर्ण होवुन वर्षे – दिड वर्षे होत आहे, सदर इमारतीच्या सुशोभिकरणासाठी कुंडीमध्ये शोभीवंत वृक्ष लावुन दर्शनी भागात ठेवण्यात आलेले आहे, मात्र सुभोभिकरणाच्या वृक्षामध्येच अनेक जण खर्रा खावुन थुकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे, मात्र याकडे पंचायत समिती प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

राज्यात सुगंधीत तंबाखु व गुटखावर बंदी आणलेली आहे मात्र मूल पंचायत समिती परीसरात सर्रास खर्रा खावुन येण्याचे प्रकार सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

नियमाचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई करू : सुनिल कारडवार
ग्रामीण भागातील नागरीक मोठया प्रमाणावर पंचायत समिती मध्ये कामानिमीत्य येत असतात, यामुळे खर्रा, गुटखा खावुन प्रवेश बंदी अशा फलक पंचायत समितीच्या दर्शनीभागावर लावु आणि कर्मचाÚयांसाठी नोटीस काढुन ताकीद देण्यात येणार आहे, असे असतानाही खर्रा खावुन आल्यास दंडात्मक कारवाई करू अशी प्रतिक्रीया मूल पंचायत समितीचे प्रभारी संवर्ग विकास अधिकारी सुनिल कारडवार यांनीे दिली.