बल्लारपूर काटा गेट जवळील घटना
बाप लेक जात होते रेल्वे स्टेशनला
विसापूर प्रतिनिधी: – मुलगा होळी सणासाठी गावी आला. आनंदात सण साजरा केला. आई, वडील, भावंडा सोबत चार दिवस घालविले. आनंदात घालविलेले क्षण उराशी बाळगून वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कर्तव्यावर जाण्यासाठी सोमवारी घरून सकाळी बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी निघाला. मात्र त्याची काळ वाट पहात होता.बाप लेक दुचाकीने जात असताना मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली. याचा त्या उमद्या तरुणानाचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजता दरम्यान बल्लारपूर काटा गेट वळणावर घडली. कुणाल गजानन डबरे (३५) रा. विसापूर ता. बल्लारपूर असे मुर्तकाचे नाव आहे.
विसापूर येथील गजानन डबरे व त्याचा मुलगा कुणाल दुचाकी क्रमांक एम. एच.३४-व्ही ०९९४ ने आज रेल्वे स्टेशन ला जात होते. अद्यात वाहणाच्या कचाट्यात दुचाकी आली. कुणाल व त्याचे वडील गजानन रस्त्यावर पडले. मागून येणाऱ्या वाहनाने कुणाल ला चिरडले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन लहान मुलं, आई, वडील, भाऊ, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे. वडिलांच्या डोळ्यासमोर तरण्या मुलाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कुणाल डबरे यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता विसापूर येथील स्म्शानभूमीवर अंत्यविधी केला जाणार आहे.