भरधाव हायवाची दुचाकीला धडक

दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

मूल (प्रतिनिधी) : गिट्टी भरून भरधाव वेगाने जात असलेल्या हायवाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मूल येथील उमा नदी जवळ टि पाईंट वर दुपारी 4 वाजता दरम्यान घडली. नरेश दिलीप ठाकरे वय 26 वर्षे, सिंधु दिपलीप ठाकरे वय 34 वर्षे, देवाजी चिमा कांबळे वय 58 वर्षे रा. कोटगल असे जखमींचे नांव आहे.

गडचिरोली जिल्हयातील कोटगल येथील नरेश दिलीप ठाकरे वय 26 वर्षे, सिंधु दिपलीप ठाकरे वय 34 वर्षे, देवाजी चिमा कांबळे वय 58 वर्षे हे तिघेजण लग्नासाठी आले होते, मूलवरून दुचाकी क्रं. एम एच 33 ए के 4142 ने परत जात असताना उमा नदी जवळील टि पाईंट जवळ गिट्टी भरून भरधाव वेगाने जात असलेल्या हायवा क्रं. एम एच 40 सी डी 4486 ने धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहेत. हायवाची दुचाकी जोरदार धडक बसल्याने दुचाकी चकनाचुर झाली आहे. हायवा चालक घटनास्थळावरून फरार झालेला आहे.
जखमीना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक करून चंद्रपूर रेफर करण्यात आले आहे. घटनास्थळाचा मूल पोलीसांनाी पंचनामा करून पुढील तपास करीत आहे.