शेतकरी बांधवाची कीटकनाशक फवारणी कार्यशाळा संपन्न

चिमूर :-प्रमोद मेश्राम पंचायत समिती कार्यालय चिमूर अंतर्गत चिमूर तालुक्यातील शेतकरी बांधवांचे कीटकनाशक फवारणी विषयक कार्यशाळा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कडून घेण्यात आली.

यावेळी सिंजेत कंपनीचे अधिकारी यांनी शेतकरी बांधवांना कीटकनाशक फवारणी संबंधी सखोल असे मार्गदर्शन केले याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री लक्ष्मीनारायण दोडके सहाय्यक गटविकास अधिकारी तथा कृषी अधिकारी सरोज सहारे ,तालुका कृषी अधिकारी श्री तिखे, कृषी अधिकारी राठोड शेंडे आदी उपस्थित होते

खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत असून शेतकरी खरीप हंगामात कापूस धान सोयाबीन तूर या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करीत असून सदर विषयावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव होत असते त्याच्या सिंचनाकरिता शेतकरी विविध व कीटकनाशकाची फवारणी करतात व चुकीच्या पद्धतीने फवारणी केल्यास त्याचा काहीच उपयोग होत नाही. शेतकऱ्यांच्या आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होते परिणामी वेळ व पैसा वाया जातो यासाठी सदर कार्यशाळा मार्गदर्शन करण्यात आले तसेच खरीप हंगामासाठी कृषी केंद्रामध्ये खते उपलब्द आहेत.

रशिया युक्रेन युद्धामुळे भविष्यात दरवाढ व टंचाई होण्याची निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना आत्ताच खते खरेदी करावे असे आवाहन कृषि विकास अधिकारी यांनी केले प्रास्ताविक कृषी अधिकारी सरोज सहारे ,तर आभार प्रदर्शन राठोड कृषी अधिकारी चिमूर यांनी केले