जिल्हयात चर्चेला आले उधाण
चंद्रपूर (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासुन जिल्हयात कॉग्रेस विरूध्द कॉंग्रेस असे चित्र बघायला मिळत असतानाच आता कॉंग्रेसचा एक मोठा नेता भाजपाच्या वाटेवर असल्याची खमंग चर्चा जिल्हयात सुरू असल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नौकर भरतीची सिबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार असलेले बाळु धानोरकर यांनी संसदेत केली, मागणीची दखल घेत केंद्रीय सहकार मंत्री नामदार अमीत शहा यांनी सीबीआय चौकशी करण्याचे आश्वासन दिले, जिल्हा बॅंकेवर कॉंग्रेसचे संचालक असतानाही कॉंग्रेसच्याच खासदारानी सीबीआय चौकशीची मागणी केल्याने कॉंग्रेस विरूध्द कॉग्रेस असेच चित्र सध्या चंद्रपूर जिल्हयात पहायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत हे अध्यक्षपदी विराजमान होताच अनेक नवनविन योजना अमलात आणले, अनेक बेरोजगारांना राजीव गांधी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातुन रोजगार उलब्ध करून दिले, त्यासोबतच अनेक आजारी व्यक्तींना आर्थीक बळ देवुन त्यांच्या चेहÚयावर आनंद फुलविण्याचे काम त्यांच्याच माध्यमातुन पुर्ण होत आहे मात्र त्यांच्याच कार्यकाळात त्यांच्याच खासदारांकडुन सीबीआय चौकशीची मागणी केल्याने अनेकानी नाराजी व्यक्त करीत आहे.
जिल्हयात पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळु धानोरकर यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस पक्षात चांगले संघटन सुरू असतानाच आता नविन वादळ उभे झाल्याने त्याची ‘‘झळ’’ आता कॉंग्रेसलास सोसावी लागणार आहे, विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जे काम करायला पाहिजे ते कॉंग्रेसकडुन होत असल्याने भाजपातील नेतेही आता कॉंग्रेस मधील ‘‘तमाशा’’ बघण्यात धन्यता मानत आहे. याचाच फायदा आता भाजपालाच होणार असुन कॉंग्रेसचा एक दमदार नेता भाजपात जाणार असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. सदर चर्चा सत्यात उतरल्यास कॉंग्रेसला जिल्हयात मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत.