रासेयो शिबिराच्या माध्यमातून चंद्रपूर पोलिस,चंद्रपूर तर्फे स्व – संरक्षण कार्यशाळा

स्वच्छ भारत, पर्यावरण, मतदान जनजागृती युवा शक्ती शिबिर संपन्न

मूल (प्रतिनिधी) : ‘महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा’ व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वच्छ भारत, पर्यावरण, मतदान जनजागृती युवा शक्ती शिबिर दिनांक २० मार्च ते २७ मार्च या कालावधीत सोमनाथ,ग्रामपंचायत मारोडा तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते .

या शिबिराचे उद्घाटन महारोगी सेवा समिती,वरोरा चे विश्वस्त मा. श्री. कौस्तुभ आमटे यांच्या हस्ते झाले. आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून महारोगी सेवा समिती वरोरा च्या मा. सौ. पल्लवी आमटे, महाविद्यालयाचे प्रमुख पाहुणे म्हणून महारोगी सेवा समिती चे विश्वत मा. श्री. अरुण कदम, कार्यक्रम अधिकारी तथा शिबिर प्रमुख डॉ. रंजना लाड, प्रा डॉ नरेंद्र पाटील, शिबीर प्रमुख व कार्यक्रम अधिकारी, ग्रामपंचायत मारोडाचे सरपंच मा. श्री. भिकारुजी शेंडे, उपसरपंच मा. श्री अनुप नेरलवार, श्री. बंगाली गेडाम सदस्य याच्या सह पोलिस अंमलदार प्रविण रामटेके चंदपूर पोलिस स्टेशन, पोलिस अंमलदार मा. मुकेश ताडेकर, पोलिस अंमलदार मा. राजेंद्र दुर्गे नक्षल पथक / C. 60 मा. श्री. गिरीश मरापे पोलिस मुख्यालय चंद्रपूर व सर्व पोलीस प्रशिक्षण टिम उपस्थित होते.

या वेळी शिबिरामध्ये सर्व स्वयंसेवकांना व विशेष मुलीनं करीता स्वयंसंरक्षणाचे प्रक्षिणन दिले. डेंजर झोन असो की अथवा बेकायदेशीर जागेत मुली आढळल्यास अशा वेळेस 191(महीला अत्याचार) वर फोन करा. तसेच बँकेच्या मार्फत होणारे विविध संपर्क ओटीपी च्या माध्यमातून पैसे लुटणारे, व सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक आयडी बनवून आपल्याला पैसे मागवून आपले लूट करणारे सुद्धा दोषी व आरोपी असतात म्हणून या सोशल नेटवर्क मुळे होणारे आपल्या अन्यायावर पोलीस तक्रार करा अथवा ११२ (सर्व करीता) तातडीने संपर्क करा १५ मीनिटात योग्य ती कारवाई केली जाईल अशा शब्द चंद्रपूर पोलिस तर्फे स्वयंसंरक्षण कार्यशाळेत टिम ने व्यक्त केला. नंतर विद्यार्थ्यांसोबत खुले चर्चासत्र करून त्यावर उपाययोजनाही सांगितल्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जिवतोडे, तर आभार प्रदर्शन संकेत कायरकर यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित प्राध्यापक वृंद, कर्मचारी वर्ग कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.