सायबर फसवणूक विषयी मार्गदर्शन शिबिर

सायबर सेल चंद्रपूर करणार मार्गदर्शन : ग्राहक पंचायत भद्रावती यांचा उपक्रम

अतुल कोल्हे भद्रावती : ग्राहक पंचायत भद्रावती येथे मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हे याविषयी अनेक तक्रारी येत आहे. त्यामुळे ग्राहक पंचायत, भद्रावती आणि विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ एप्रिल २०२२ रोज मंगळवार ला सकाळी ठीक 9:30 वाजता विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे सायबर फसवणूक विषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराला पोलीस स्टेशन सायबर सेल चंद्रपूर चे मा. अप्पर पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, सायबर हायजेनिक प्रॅक्टिशनर मा. मुजावर अली आणि पोलीस अमलदार सायबर सेल चंद्रपूरचे संतोष पानघाटे यांची उपस्थिती राहणार आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी घ्यावयाची दक्षता, ए.टि.एम. वापरतांना घ्यावयाची काळजी, विदेशात नोकरी, बँक लोन, कौन बनेगा करोडपती, लॉटरी याविषयी होणारी फसवणूक तसेच सोशल मीडिया वापरत असताना काय करू नये या विषयी संपूर्ण माहिती पोलीस स्टेशन सायबर सेल चंद्रपूर यांच्या कडून देण्यात येणार आहे.

ग्राहक पंचायत, भद्रावती आणि विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती तर्फे भद्रावती येथील विद्यार्थ्यांना आणि समस्त जनतेला आवाहन करण्यात येत आहे कि, सायबर फसवणुक विषयी मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा लाभ ध्यावा.