सामाजीक संघटनांमध्ये संताप कारवाही करण्याची मागणी
अतुल कोल्हे भद्रावती :-
भद्रावती शहरात मुडके नसलेले निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेची माहिती परिसरात होताच कायद्याचे भान न राखता काही समाजकंटकांनी पोलिसांसमक्ष ते निर्वस्त्र फोटो काढण्यात आले. व त्यानंतर परस्पर इतरत्र व्हाट्सअपवर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने सामाजिक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ज्यांनी हे फोटो काढून वायरल केले त्यांचा पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा समन्वयक राज्य महिला आयोग मुंबई वनिता घुमे, विवेकानंद स्पोर्टिंग क्लब चे राजेश मते ,सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर ,डॉ. भीमराव आंबेडकर युथ क्लब चे संदीप जीवने यांनी संताप व्यक्त केला आहे.