सक्सेस कॉम्प्युटर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मूल (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मुल येथील एकमेव सरकारमान्य संगणक  प्रशिक्षण संस्था सक्सेस कॉम्प्युटर एज्युकेशन येथे सकाळी 11 वाजता दरम्यान साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सक्सेस कॉम्प्युटर एज्युकेशनच्या मुख्य प्रशिक्षक सुजाता तावाडे हया होत्या, प्रमुख अतिथी म्हणुन संस्थाप्रमुख नितीन येरोजवार, प्राचार्य विनोद काळबांधे, भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळीग मुख्य प्रशिक्षक सुजाता तावाडे व संस्थाप्रमुख नितीन येरोजवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन संदिप निकोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशिक्षक भोयर यांनी मानले, यावेळी विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.