शनिवारी गोंडवाना सैनिकी विद्यालयात प्रवेश परिक्षा

गडचिरोली (प्रतिनिधी): येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयात इयत्ता 6, 7 आणि 8 वी साठी रिक्त असलेल्या जागांसाठी शनिवारी सकाळी 11 वाजता प्रवेश परीक्षा आयोजीत केली आहे. सदर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहावे असे आवाहन गोंडवाना सैनिकी विद्यालय प्रशासनाने केले आहे.

गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयात शैक्षणिक सत्र 2022-23 यावर्षासाठी शनिवार 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विद्यालयातलेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.. आणि जे विद्यार्थी लेखी परीक्षा उतीर्ण होतील त्यांची शाररिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता आयोजीत करण्यात आली आहे.