चंद्रपूरातील कॅफे मद्रास हॉटेलला लागली आग

नागरीकांच्या समयसुचकतेने अनर्थ टळला

चंद्रपूर (प्रतिनिधी): चंद्रपूर : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या कॅफे मद्रास या हॉटेलला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या लोकमान्य टिळक शाळेसमोरील कॅफे मद्रास या हॉटेलला सकाळी दहा वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. पाहता पाहता ही आग वेगाने वाढू लागली. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

घटनेची माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या वाहनांनी आग आटोक्यात आणली असून आगीवर ताबा मिळवला आहे. या आगीमुळे हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीमुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर कॅफेजवळील लोकमान्य टिळक शाळेला सुट्टी देण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

काही वर्षापुर्वी हॉटेल मद्रास येथे आग लगली होती हे विशेष.