झोपलेल्या इसमाला बिबट्याने उचलून नेत केले ठार

सरटपार चक येथील घटना
सिंदेवाही (प्रतिनिधी) अंगणात गाळ झोपलेल्या इसमाला बिबट्यानें अलगत उचलून नेत ठार केल्याची घटना तालुक्यातील सरडापार चक येथे घडली, बिबट्याने ठार केलेल्या इसमाचे नाव माणिक बुधा नन्नावरे वय ७० वर्ष असे आहे.
ग्रामीण भागातील लोक उन्हाळ्यात गर्मीमुळे अंगणात झोपतात.तालुक्यातील सरडपार चक येथील माणिक बुद्धा नन्नावरे हे सोमवारी बाहेर झोपले असताना बिबट्याने त्याला उचलून नेत ठार केले. सदर घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून वन्यप्राणी गावात येऊन शिकार करीत असल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आहे.