विदर्भ तापला : चंद्रपूर, वर्धा, अकोला 44 अंशावर

विदर्भात उष्णतेची लाट

मुंबई (प्रतिनिधी) : उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून विदर्भात सूर्याची भट्टी तापत आहे.

बुधवार, 19 एप्रिल रोजी अकोला, वर्धा आणि चंद्रपूर येथे कमाल 44.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. यवतमाळ कमाल 44, अमरावती 43.4, नागपूर 43.6, गोंदिया 43.2, बुलढाणा 41.5, गडचिरोली 40.6, वाशिम 43 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. z नागपूरनंतर विदर्भात अकोला सर्वाधिक तापणारे शहर आहे. 29 एप्रिल 2019 रोजी अकोला येथे सर्वाधिक 47.2 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली.