बल्लारशाह प्लायवूड कपंनी परिसरात भीषण आग

 बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील घटना
अग्निशमन दलाने मिळविले आगीवर नियंत्रण

विसापूर  (प्रतिनिधी) : मागील २५ वर्षांपूर्वी पासून विसापूर गावाच्या हद्दीतील बल्लारशाह प्लायवूड कपंनी बंद आहे. बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील या कपंनीत बुधवारी सकाळी १०.४५ वाजता दरम्यान परिसरात अचानक आग लागली. हळूहळू आगीने रौद्र रूप धारण केले. परिणामी राज्य महामार्गांवरील वाहतूक प्रभावित झाली. या घटनेची माहिती बल्लारपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.

चंद्रपूर जिल्यात आठवड्यापासून सूर्य देवता कोपली आहे. तापमान जागतिक दर्जावर पोहचले आहे. यामुळे आगीच्या घटना दररोज घडत आहे. अशातच बुधवारी सकाळच्या सुमारास बल्लारपूर – चंद्रपूर राज्य महामार्ग दरम्यान बल्लारशाह प्लायवूड कपंनी परिसरात आग लागल्याची घटना घडली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. बंद असलेल्या कपंनीत ओसाड परिसर आगीच्या भक्षस्थानी आला. यामुळे काहीवेळ या मार्गावरील वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली.

विसापूर गावाच्या हद्दीतील व राज्य महामार्ग दरम्यान सन्मित्र सैनिक शाळा, नवीन सैनिक शाळा, मातोश्री वृद्धाश्रम व अन्य लहान उद्योग आहे. यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले. बल्लारपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाने अगीच्या भडक्यावर नियंत्रण मिळविल्याने या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here