रोहयोच्या कामात बोगस मजुर दाखवुन लाखो रूपयाचा गैरव्यवहार

दोषींवर कारावई करा : वर्षाताई लोनबले

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील टोलेवाही येथे मागील अनेक दिवसांपासुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे सुरू आहे. सदर कामांची देखरेख रोजगार सेवक चंद्रकांत भेंडारे हे करीत असतानाही मात्र याठिकाणी कामावर न आलेल्या मजुरांच्या नावाने मजुरी काढुन लाखो रूपयाचा गैरव्यवहार करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मूल पंचायत समितीच्य सदस्या वर्षाताई लोनबले यांनी केली आहे.

मूल तालुक्यातील मौजा टोलेवाही येथे स्वतंत्र ग्राम पंचायत आहे, सदर ग्राम पंचायत मध्ये चंद्रकांत भेंडारे हे रोजगार सेवक म्हणुन कार्यरत आहेत, टोलेवाही येथे मागील अनेक महिण्यापासुन राश्ट्रीय रोजगार हमी योजनेचे कामे मोठया प्रमाणावर करण्यात येत असुन काही दिवसांपुर्वी नाला खोलीकरण आणि वृक्ष लागवडीचे काम करण्यात आलेले आहे, सदर कामावर टोलेवाही येथील सागर आबाजी मोहुर्ले, दयानंद माधव निकुरे, बंडु रामदास महाडोळे, अर्चना अनिल मोहुर्ले, अनिल मारोती मोहुर्ले, मारोती लिंगा मोहुर्ले, रघनाथ पत्रु गेडाम, सुनिता शामराव भेंडारे, सुनिता षामराव भेंडारे, षिला संजय येरमलवार, देवदास एकनाथ लेनगुरे हे मजुर नाला खोलीकरण, वृक्ष लागवडीच्या कामावर गेलेले नाही मात्र कामावर आल्याचे दाखवुन त्यांच्या नावाने अनेकदा बॅंकेमध्ये पैसे जमा केलेले आहे, तर काही मजुरांना रोख रक्कम देवुन सदर कामात लाखो रूपयाचा गैरव्यवहार करण्यात आलेला आहे.

सदर कामावर बोगस मजुर दाखवुन मजुरी काढणाÚयाराष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्यो मूल येथील अधिकारी, कर्मचारी आणि टोलेवाहीचे रोजगार सेवकांनी बनावट मजुर दाखवुन रोजगार हमी योजनेच्या पैस्याची पध्दतषीरपणे विल्हेवाट लावलेली आहे. यामुळे मौजा टोलेवाही येथे मागील पाच वर्षात झालेल्या संपुर्ण कामाची सखोल चौकषी करून दोषींवर कारवाई करण्यात यावे अन्यथा तिव्र आंदेालन करण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य वर्षाताई लोनबले यांनी दिला आहे. सदर निवेदनाची पत्र त्यांनी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यपालन अधिकारी, तहसीलदार मूल, संवर्ग विकास अधिकरी मूल यांना दिले आहे.