पित्यानेच केला विवाहीत मुलीचा विनंयभग

पवित्र नात्यालाच काळीमा फासणाऱ्या बापाच अशोभनीय कृत्य

भद्रावती (प्रतिनिधी) : सासरच्या मंडळीशी पटत नसल्याने मागील काही महिण्यापसुन वडीलाच्या घरी येवुन राहात असलेल्या एका विवाहीत मुलीचा बापाने विनयभंग केल्याची घटना भद्रावती येथे घडली. मुलीच्या तक्रारीवरून 53 वर्षीय नराधम बापाला पोलीसांनी अटक केली आहे.

सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी ही विवाहित असून तिचे सासरच्या मंडळींशी पटत नसल्याने ती पतीला सोडून मागील 10 महिन्यांपासून आपल्या आई-वडीलांकडे आली होती. याच दरम्यान प्रबळ वासनेच्या आहारी गेलेल्या आरोपी वडीलाने पोटच्या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पिडीत मुलीने याबाबत भद्रावती पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याआधारे पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहे.