उद्या शनिवारी डोंगरगांव सेवा सहकारी संस्थेची निवडणुक

10 जागेसाठी 14 उमेदवार रिंगणात तर 3 अविरोध

मूल (प्रतिनिधी) : सहकार क्षेत्रासाठी अतिशय महत्वाची मानली जाणारी सेवा सहकारी संस्थेच्या डोंगरगांव येथील निवडणुक उद्या 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे, सदर निवडणुकीत 10 जागेसाठी 14 उमेदवार रिंगणात उतरल्याने होणारी निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मूल तालुक्यात जवळपास 15 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यरत आहेत, यापैकी राजोली विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक पदासाठी काही दिवसांपुर्वी निवडणुक झाली होती, तर बहुतांष विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि सेवा सहकारी संस्थेच्या संचालक अविरोध निवडुण आलेले आहेत, मात्र डोंगरगांव येथील सेवा सहकारी संस्थेच्या 13 संचालकपदासाठी 19 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले होेते, त्यापैकी शंकर शेंडे यानी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मंगेश ठिकरे हे इतर मागासवर्गीय मतदार संघातुन अविरोध निवडुण आले, तर महिला राखीव मतदार संघातुन धृपदाबाई मोहुर्ले आणि विमलवाई वासेकर या अविरोध निवडुन आल्या, तर सर्वसाधारण गटातुन विनोद चांभारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 10 जागेसाठी 14 उमेदवार निवडणुकचा सामना करणार आहेत.

सर्वसाधारण गटातुन उभे असलेल्या उमेदवारांमध्ये किरण पोरेड्डीवार, मधुकर मुंगमोडे, सुभाष शेंडे, अली रमजान अली सय्यद अजगर, बंडु मांदाडे, रमेश ठिकले, गिरीधर चौधरी, गिरीधर मस्के, सुनिता ठगे हे आहेते तर अनुसुचित जाती जमाती गटातुन नामदेव खोब्रागडे व अभय अलोणे, विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासप्रवर्ग गटातुन हरीदास चांभारे आणि राजेंद्र चांभारे हे आपले नशिब अजमावित आहेत.

सदर निवडणुक 30 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत होणार आहे, तर मतमोजणी त्याचदिवशी दुपारी 4.30 वाजता नतर जाहीर करण्यात येणार आहे. सदर निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रात असलेल्या राजकीय एकाधिकारशाहीला जब्बर धक्का बसला आहे हे विशेष.