प्रशासक आणि मुख्याधिकारी मूल यांना निवेदन सादर
मूल (प्रतिनिधी) : करोडो रूपये खर्च करून मूल येथील स्मशानभुमीचे सौंदर्यीकरण करण्यात आले मात्र स्मशानभुमीतील मोठया वृक्षांवर मधमाशाचे पोळे असल्यामुळे अंत्यसंस्कारसाठी आलेल्या व्यक्त्तींवर हल्ले करीत असलयाने अनेकजण जखमी झाल्याची घटना याठिकाणी अनेकदा घडत आहे, नगर पालीका प्रशासनाने स्मशानभुमीतील मधमाशाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी केली आहे.
मूल नगर पालीके अंतर्गत काही दिवसांपुर्वीच करोडो रूपये खर्च स्मशानभुमीचे विविध विकास कामे हाती घेवुन सौंदर्यीकरण करण्यात आले. स्मशानभुमीच्या परिसरात मोठमोठे झाडे असुन याझाडावर मशमाशाचे पोळे आहेत, मूल येथे एकच स्मशानभुमी असुन याठिकाणीच अंत्यसंस्कार पार पाडले जातात, अंत्यसंस्काराच्या वेळी अग्नीदिल्यानंतर धुर निघत असल्याने मधमाशा उडुन अंत्यसंस्कारासाठी आलेल्या व्यक्तींना चावा घेत असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर मशमाशांमुळे अंत्यसंस्कारासाठी जावे कि नाही अशा प्रश्न आता नागरीकांना पडला आहे, यामुळे प्रशासनाने तात्काळ मशमाशांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मूल नगर पालीकेचे माजी उपाघ्यक्ष राकेश रत्नावार यांनी नगर पालीकेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी निवेदनाव्दारे केली आहे.