कृती समीतीच्या समन्वयक पदी राममोहन ब्राडीया यांची निवड

मूल (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाशिवाय शासन दरबारी प्रलंबीत असलेल्या अन्य महत्वाच्या मागण्यांच्या पुर्ततेसंबंधी राज्य व विदर्भ संघटनेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी नाराज आहेत. नाराज असलेल्या दोन्ही जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रलंबीत प्रश्नाची माहीती होऊन त्यांचे समाधान करण्यासाठी शासनस्तरावरून माहीती घेण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या गडचिरोली येथील संघटनेच्या सभेत जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटने अंतर्गत बारा सदस्यीय कृती समिती निर्माण करण्यात आली.

निर्माण करण्यात आलेल्या संघटनेच्या कृती समितीची सभा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत रंदई यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच मूल येथे पार पडली, पार पडलेल्या सभेत संघटनेच्या कृती समितीचे समन्वयक म्हणुन ब्रम्हपुरी येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे मुख्य लिपीक श्री राममोहन ब्राडीया यांची एकमताने निवड करण्यात आली.

सभेत शासनस्तरावर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या आणि प्रश्न कोणत्या स्तरावर आहेत. कोणत्या कारणांसाठी प्रलंबीत आहेत. याची वास्तविक माहीती जाणुन घेण्यासाठी समितीच्या सहा सदस्यांनी मुंबईला जावुन माहीती जाणुन घेतल्यानंतर त्यानुसार स्वतंञ कार्यवाही करावी. तसेच दोन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांच्या पूर्ततेसाठी सहसंचालक यांना भेटुन समस्या अवगत करून देण्याचे एकमताने ठरविण्यात आले.

सभेला कृती समीतीचे सदस्य सर्वश्री गजानन काळे, विनोद चोपावार, हुमेश काशीवार, विशाल गौरकर, अरुण जुनघरे, चंद्रकांत खोके, राजेश्वर कायरकर, शशीकांत माडे, राममोहन ब्राडीया, लोमेश दरडे आणि संजय पडोळे उपस्थित होते.