तेंदुपत्ता तोडणाऱ्या इसमावर वाघाचा हल्ला : मजुरामध्ये भीतीचे वातावरण

नागभिड (प्रतिनिधी) : रोजगार उपलब्ध नसल्याने तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना नागभिड तालुक्यातील नवेगावं हंडेश्वरी शिवारात घडली. आडकुजी मारोती गेडाम वय ६० वर्ष असे वाघाच्या हल्ला ठार झालेल्या इसमाचे नांव आहे.

नाभभिड तालुक्यातील नवेगाव हंडेश्वरी येथील आडकुजी मारोती गेडाम वय 60 वर्षे हे नवेगांव हंडेश्वरी शिवारात सकाळी ७ वाजता दरम्यान तेंडूपत्ता तोडण्यायाकरिता गेले होते, दरम्यान दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने आकडुजीवर हमला करून ठार केले. सदर घटनेची माहिती सोबत असणाÚया मजुरांच्या लक्षात येता त्यांनी गावात व वनविभागाला माहिती दिली, वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. महेश गायकवाड व त्यांची चमू घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे पाठविण्यात आले.

वनविभागामार्फत अत्यंसंस्कारसाठी सानुग्रह अनुदान कुटुंबियाना देण्यात आले. शासकीय धोरणानुसार आर्थिक मदत देण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ महेश गायकवाड यांनी सांगितले. या घटनेमुळे तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.