माजी नगरसेवक विनोद कांमडी यांची मागणी
मूल (प्रतिनिधी) : शहराचे सुशोभिकरण करण्याकरिता शहरातील सर्व प्रभागातील चौकाचौकांमध्ये पाण्याचे फवारे तयार करण्यात आले शहरातील जनतेला रात्रीच्या वेळी फिरत असताना विशेष आकर्षण वाटावे पाण्याचे फवारे लावण्यात आले. मात्र हे पाण्याचे फवारे अनेक दिवसापासून बंद स्थितीत आहेत. बंद असलेले पाण्याचे फवारे तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी नगर परिषदेचे माजी नगरसेवक कामडे यांनी केली आहे.
मूल शहरात 17 वार्ड आहेत प्रत्येकी अंदाजे 2 लाख रुपये प्रमाणे 34 लाखाचा खर्च नगरपरिषदेने या कामाकरिता केला आहे. मात्र त्यांच्या काही उपयोग झालेला दिसत नाही हे सुशोभीकरण दिखावा करण्याकरिता करण्यात आला का? असा प्रश्न विनोद कांबळी यांनी उपस्थित केला आहे? या विषयाकडे प्रशासन दुर्लक्ष केले आहे नावलौकीक करण्याकरिता सुशोभीकरण वर खर्च करुन जनतेचा पैशाची उधळपट्टी केली. असल्याचा आरोप कामडी यांनी केला आहे.
शहरातील 17 वार्डातील लावण्यात आलेले पाण्याचे फवारे सुरू करण्यात यावे अन्यथा प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मूलचे उपविभागीय अधिकारी तथा नगर पालीकेचे प्रशासकीस महादेव खेळकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुरेश फुलझेले, संदीप मोहबे, न प माजी उपाध्यक्ष चंद्रकांत चटारे आसिफ पठाण, आशिष रामटेके, अतुल गोवर्धन, गिरीधरगाजेवार, दिवाकर वाढई आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.