भरधाव ट्रकच्या धडकेत दोन ठार एक गंभीर जखमी

नागभिड (प्रतिनिधी) :   येथील बोकडे परिवारातील तिघे नागभीड येथील रेल्वे पटरी जवळील रस्ता पार करीत असताना गडचिरोली येथे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता घडली.

नागभिड पोलीस स्टेशन जवळ असलेल्या रेल्वे पटरी जवळ रेल्वे चे काम सुरू असून भूषण शामराव बोकडे, वय २१, पवन विनोद बोकडे १५ गिरीष सुधाकर बोकडे वय १६ वर्ष हे तिघेही दुचाकीने नागभिड येथील चिखलपरसोडी रस्ता पार करीत होते.  दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकनी दुचाकीला धडक दिल्याने 2 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

पोलिसांनी घटनस्थळी दाखल होऊन पंचनामा केला.  ट्रक ड्रायव्हर सह वाहन ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक बरसगडे करीत आहे.

सदर घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून तरुण मुलांचा मृत्यू झाल्याने बोकडे कुटुंबावर संकट कोसळले.