तेंदुपत्ता तोडणाऱ्या मजुरावर वाघाचा हल्ला

मजूर जखमी

गोंडपिपरी (प्रतिनिधी) :  तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरावर वाघाने हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली.गोपाल दिवाकर आत्राम असेल वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.

सद्या तेंदूपत्ता तोडण्याचे काम सुरु असून मजूर वर्ग मोठया प्रमाणात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जगलात जात असतात, गोपाल दिवाकर आत्राम हे दुपारपेट ता. गोंडपिपरी येथे तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. दरम्यान वाघाने तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरावर हमला करुन जखमी केले. त्यांना उपचारार्थ गोंडपिपरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.