गळफास घेऊन युवकांची आत्महत्या

आजाराला कंटाळून केली आत्महत्या 

आशिष लोणबले, चिरोली :  औषधोपचार करूनही आजार बरा होत नसल्याने कंटाळून एका युवकांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मूल तालुक्यातील कांतापेठ येथे सकाळी 9 वाजता उघडकीस आली. सुरज नानाजी मांदाळे असे आत्महत्या केलेल्या युवकांचे नाव आहे.

मूल तालुक्यात मोठया प्रमाणात मजूर वर्ग तेंदूपत्ता तोडण्यासाठी जात असतात मूल तालुक्यातील कान्तापेट येथील सूरज नानाजी मांदाळे याची आई-वडील तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेले होते. घरी आल्यावर मुलगा दिसला नाही म्हणून घरा शेजारी विचारपूस केली असता.मुलगा आता पर्यंत होता असे सांगितले.त्यानंतर आई घरात गेली असता मधल्या खोलीत मुलगा गळफास घेऊन होता. घटनेची माहिती मूल पोलीसांना देण्यात आली दरम्यान  पोलीस घटनास्थळी दाखल होऊन शव खाली उतरवून मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले.

घटनास्थळाला मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, चिरोली पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी भेट दिली. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.