केंद्र व राज्य सरकारलाच ओबीसीचे राजकीय आरक्षण नको

वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांचा आरोप
विसापुरात पार पडला कार्यकर्ता मेळावा

विसापूर (प्रतिनिधी) : देशात मंडल आयोग लागू झाल्यापासून २७ टक्के आरक्षण ओबीसीसाठी दिले आहे. केंद्र सरकारने २०११ साली देशभरात सामाजिक, आर्थिक जणगनणा केली. तो डाटा केंद्र सरकारकडे जमा आहे. मात्र केंद्र सरकार तो डाटा जमा आहे.न्यायालय तो डाटा सादर करा म्हणून सरकार ला वारंवार सांगत आहे. मात्र केंद्र व राज्य सरकार ओबीसीच्या राजकीय आरक्षण संदर्भात गंभीर दिसत नाही. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसीच्या राजकीय आरक्षण शिवाय घेण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारलाच ओबीसीचे राजकीय आरक्षण नको, असे दिसून येते असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी मंगळवारी विसापूर येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केला.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्ष कविता गौरकार होत्या तर प्रमुख अतिथी, मार्गदर्शक म्हणून भूषण फुसे, उपाध्यक्ष आनंद अँगलवार, जेष्ठ नेते बंडू नगराळे, चंद्रपूर शहर अध्यक्ष तनुजा रायपूरे, महासचिव अल्का मोटघरे, जिल्हा प्रवक्ता निशा ठेंगरे, पुष्पलता कोटंगळे, विसापूच्या सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, शिला नगराळे, रमेश लिंगम्पल्लीवार, भगिरथ वाकडे, राजेश गावंडे यांची उपस्थिती होती.

दरम्यान विसापूर शाखेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले चौक व अशोक नगर वार्ड चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या फलकाचे अनावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन गावातील महापुरुषाच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूर येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर घेऊन बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा केला. कार्यकर्ता मेळाव्यात आनंद अँगलवार, अनेकश्वर मेश्राम, बंडू नगराळे, शिला नगराळे, अल्का मोटघरे, तनुजा रायपुरे यांनी मार्गदर्शन करून वंचित बहुजन आघाडीचे संघटन लोकांभीमुख करण्याचे सांगितले. प्रास्ताविक रमेश लीगमपाल्लीवर यांनी केले. संचालन राजेश गावंडे यांनी तर आभार विद्या घोगरे यांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, सरोज केकती यांच्या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.