शौचास गेलेल्या चिमुकल्याचा अपघातात मृत्यु

मूल (प्रतिनिधी) : शौचास जावुन घरी परत येत असतानाच सावली वरून भरधाव वेगाने मूलकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाने एका चिमुक्याला धडक दिल्याने तो ठार झाल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा आकापूर येथे सकाळी 10.30 वाजता दरम्यान घडली. आयुष साईनाथ सोयाम वय 5 वर्षे असे अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव आहे.

तालुक्यतील आकापूर येथील साईनाथ सोयाम यांना दोन मुल असुन एक 9 वर्षाची मुलगी आहे तर 5 वर्षाचे आयुष नावाचा मुलगा होता, रोजच्या प्रमाणे शनिवार सकाळी 10.30 वाजता दरम्यान आयुष हा घराच्या समोर शौचविधीसाठी गेला होता, शौचविधी पार पाडुन घराकडे परत येत असताना सावली वरून भरधाव वेगाने येणाÚया चारचाकी वाहन क्रं. एम एच 34 बि बि 0149 ने त्याला जोरदार धडक दिली, गावकऱ्यानी अपघातात गंभीर जखमी झालेल्या आयुषला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्त घोषीत केले. अपघातातील कार ही सावली येथील नंदकिशोर सारडा यांच्या मालकीची असुन मूल पोलीसांना चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश बनसोड, पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुध्ये करीत आहे.